देवेंद्र फडणवीस यांची भाजपाच्या विधिमंडळ नेतेपदी बहुमताने निवड झाली

मुंबईः देवेंद्र फडणवीस यांची भाजपाच्या विधिमंडळ नेतेपदी निवड झाली आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांनी देवेंद्र फडणवीसांची नेतेपदी निवड करण्याचा प्रस्ताव सादर केला. त्याला राधाकृष्ण विखे-पाटील, हरिभाऊ बागडे, सुधीर मुनगंटीवार, शिवेंद्रराजे भोसले, देवयानी फरांदे, सुरेश खाडे, मंगलप्रभात लोढा, आशीष शेलार, संजय कुटे, गणेश नाईक यांनी अनुमोदन दिलं आहे. त्यानंतर एकमतानं त्यांची भाजपाच्या विधिमंडळ नेतेपदी नियुक्ती करण्यात आली आहे. सुधीर मुनगंटीवारांसह जवळपास 11 आमदारांनी फडणवीसांची विधिमंडळ नेतेपदी निवड होण्यासाठी अनुमोदन दिलं असून, फडणवीसांची नेतेपदी निवड झाली आहे. त्यामुळे भाजपाकडून देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्रिपदाचे दावेदार असल्याचं स्पष्ट झालं आहे. (संपूर्ण बातमी वाचा)

 


Comments are closed.

Visitor Hit Counter