राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळ गटनेतेपदी अजित पवार यांची एकमताने निवड

राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळ नेतेपदी अजित पवार यांची निवड करण्यात आली आहे. आज झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षाच्या सदस्यांच्या बैठकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अजित पवार यांच्या नावाची घोषणा केली. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने 54 जागांवर विजय मिळवला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला काँग्रेसपेक्षा अधिक जागा मिळाल्याने विरोधी पक्षनेतेपदाची संधी राष्ट्रवादी काँग्रेसला मिळणार आहे. (सौजन्य: लोकमत)

 


Comments are closed.

Visitor Hit Counter