‘विवो’ स्मार्टफोन नोएडा येथील नव्या प्रकल्पात ५ हजार नोकरभरती करणार

स्मार्टफोन निर्मितीतील आघाडीच्या विवो इंडियाने व्यवसाय विस्ताराची घोषणा केली असून नव्या प्रकल्पातील पहिल्या टप्प्याची मुहूर्तमेढ रोवली आहे. या प्रकल्पातून वार्षिक ८४ लाख फोन निर्मितीकरिता कंपनीने ७,५०० कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. नव्या प्रकल्पात दोन टप्प्यांमध्ये फोन निर्मितीकरिता ७,००० कर्मचारी भरती केले जाणार असून कंपनीच्या ताफ्यात वर्षभरात एकूण १५,००० मनुष्यबळ होणार आहे.

विवो इंडियाने बुधवारी उत्तर प्रदेशमधील नोएडा येथील नव्या फोन निर्मिती प्रकल्पाची घोषणा केली. या प्रकल्पातून पहिल्या टप्प्यात वार्षिक ८४ लाख फोन तयार केले जाणार आहेत. त्यासाठी ७,५०० कोटी रुपयांची गुंतवणूक व २,००० कर्मचारी भरती करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले. (संपूर्ण बातमी वाचा)

 


Leave A Reply

Visitor Hit Counter