मुंबई (ठाणे) येथे डिसेंबर महिन्यात खुल्या सैन्य भरती मेळाव्याचे आयोजन

भारतीय सैन्य दलातील विविध पदांच्या थेट भरतीसाठी दिनांक १३ ते २३ डिसेंबर २०१९ दरम्यान ठाणे येथे खुल्या सैन्य भरती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून सदरील मेळाव्यात सहभागी होण्यासाठी मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड आणि नाशिक जिल्ह्यातील उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

सोल्जर जनरल ड्यूटी (जीडी) पदाच्या जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार ४५% गुणांसह इयत्ता दहावी उत्तीर्ण असावा.
वयोमर्यादा – उमेदवाराचा जन्म १ ऑक्टोबर १९९८ ते १ एप्रिल २००२ दरम्यान झालेला असावा.
शारीरिक पात्रता – उमेदवारांची उंची: १६८ सेंमी, वजन ५० किलोग्रॅम आणि छाती ७७/८२ सेंमी असावी.

सोल्जर टेक्निकल पदाच्या जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार ५०% गुणांसह इयत्ता बारावी उत्तीर्ण (PCM) असावा.
वयोमर्यादा – उमेदवाराचा जन्म १ ऑक्टोबर १९९६ ते १ एप्रिल २००२ दरम्यान झालेला असावा.
शारीरिक पात्रता – उमेदवारांची उंची: १६७ सेंमी, वजन ५० किलोग्रॅम आणि छाती ७६/८१ सेंमी असावी.

सोल्जर टेक्निकल (नर्सिंग असिस्टंट) पदाच्या जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार ५०% गुणांसह इयत्ता बारावी उत्तीर्ण (PCB & E) किंवा बी.एस्सी. उत्तीर्ण असावा.
वयोमर्यादा – उमेदवाराचा जन्म १ ऑक्टोबर १९९६ ते १ एप्रिल २००२ दरम्यान झालेला असावा.
शारीरिक पात्रता – उमेदवारांची उंची: १६७ सेंमी, वजन ५० किलोग्रॅम आणि छाती ७६/८१ सेंमी असावी.

सोल्जर टेक्निकल (नर्सिंग असिस्टंट/ व्हेटर्नरी) पदाच्या जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार ५०% गुणांसह इयत्ता बारावी उत्तीर्ण (PCM) किंवा बी.एस्सी. उत्तीर्ण असावा.
वयोमर्यादा – उमेदवाराचा जन्म १ ऑक्टोबर १९९६ ते १ एप्रिल २००२ दरम्यान झालेला असावा.
शारीरिक पात्रता – उमेदवारांची उंची: १६७ सेंमी, वजन ५० किलोग्रॅम आणि छाती ७६/८१ सेंमी असावी.

सोल्जर क्लर्क /स्टोअर कीपर टेक्निकल (एसकेटी) पदाच्या जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार ५०% गुणांसह इयत्ता बारावी उत्तीर्ण असावा.
वयोमर्यादा – उमेदवाराचा जन्म १ ऑक्टोबर १९९६ ते १ एप्रिल २००२ दरम्यान झालेला असावा.
शारीरिक पात्रता – उमेदवारांची उंची: १६२ सेंमी, वजन ५० किलोग्रॅम आणि छाती ७७/८२ सेंमी असावी.

सोल्जर ट्रेड्समन (दहावी/ आठवी) पदाच्या जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार इयत्ता आठवी/ दहावी उत्तीर्ण असावा.
वयोमर्यादा – उमेदवाराचा जन्म १ ऑक्टोबर १९९६ ते १ एप्रिल २००२ दरम्यान झालेला असावा.
शारीरिक पात्रता – उमेदवारांची उंची: १६८ सेंमी, वजन ४८ किलोग्रॅम आणि छाती ७६/८१ सेंमी असावी.

सोल्जर फार्मा (AMC) पदाच्या जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार बारावी (भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र आणि इंग्रजी) उत्तीर्णसह डी.फार्मसी (५५% गुणांसह) किंवा बी.फार्मसी (50% गुणांसह) उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा – उमेदवाराचा जन्म १ ऑक्टोबर १९९४ ते ३० सप्टेंबर २००० दरम्यान झालेला असावा.
शारीरिक पात्रता – उमेदवारांची उंची: १६८ सेंमी, वजन ४८ किलोग्रॅम आणि छाती ७६/८१ सेंमी असावी.

मेळाव्याचे ठिकाण – मा.श्री.अब्दुल कलाम आझाद स्पोर्ट्स स्टेडियम, कौसा व्हॅली, मुंब्रा, ठाणे. (महाराष्ट्र)

कालावधी – दिनांक १३ ते २३ डिसेंबर २०१९ दरम्यान आहे.

प्रवेशपत्र – दिनांक २८ नोव्हेंबर २०१९ ते १२ डिसेंबर २०१९ दरम्यान नोंदणी केलेल्या ई-मेलवर पाठविण्यात येतील.

नोंदणी करण्याची तारीख – दिनांक १३ आक्टोबर २०१९ ते २७ नोव्हेंबर २०१९ दरम्यान ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करता येईल.

 

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा  नोंदणी करा

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!


Comments are closed.