महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून केवळ ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

यंत्र अभियंता पदाच्या ११ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार अभियांत्रिकी पदवी व एमबीए किंवा समतुल्य अर्हता आणि MS-CIT तसेच १० वर्ष अनुभव आवश्यक आहे.

विभागीय वाहतूक अधिकारी पदाच्या ८ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवी आणि MS-CIT उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

उप यंत्रअभियंता पदाच्या १२ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार ऑटोमोबाईल/ प्रोडक्शन/ मेकॅनिकल अभियांत्रिकी पदवी/ पदव्युत्तर पदवी आणि MS-CIT उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

लेखा अधिकारी/ लेखापरीक्षण अधिकारी पदाच्या २ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार बी.कॉम किंवा कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवी आणि MS-CIT उत्तीर्ण तसेच ५ वर्ष अनुभव धारक असावा.

भांडार अधिकारी पदाच्या एकूण २ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार ऑटोमोबाईल/ प्रोडक्शन/ मटेरियल अभियांत्रिकी पदवी/ पदव्युत्तर पदवी /एमबीए/ आयसीडब्ल्यूए आणि MS-CIT उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

विभागीय वाहतूक अधीक्षक पदाच्या १२ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार कोणत्याही शाखेतील पदवी/ पदव्युत्तर पदवी आणि MS-CIT उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

सहाय्यक यंत्र अभियंता (यांत्रिकी) पदाच्या ९ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार ऑटोमोबाईल/ प्रोडक्शन/ मेकॅनिकल अभियांत्रिकी पदवी आणि MS-CIT उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

सहायक/ विभागीय लेखा अधिकारी पदाच्या २ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार बी.कॉम पदवी आणि MS-CIT उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

विभागीय सांख्यिकी अधिकारी पदाच्या ७ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार एम.एस्सी. (Statistics) आणि MS-CIT उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा – उमेदवाराचे वय १९ मार्च २०१९ रोजी १८ ते ३८ वर्ष दरम्यान असावे. (मागासवर्गीय उमेदवारांसाठी ५ वर्ष सवलत.)

नोकरीचे ठिकाण – महाराष्ट्रात कुठेही

परीक्षा फीस – खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी १०००/- रुपये आणि मागासवर्गीय उमेदवारांसाठी ५००/- रुपये आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – १९ मार्च २०१९ आहे.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचनाकाराने आवशयक आहे.

 

जाहिरात डाऊनलोड करा

ऑनलाईन अर्ज करा

 

 

Comments are closed.

     
Visitor Hit Counter