राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियानात विविध कंत्राटी पदाच्या ९८१ जागा

राज्यात दीनदयाल अंत्योदय योजना- राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियानाची अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हा व तालुका अभियान मध्ये विविध पदाच्या जागा ११ महिन्याच्या करार तत्वावर निव्वळ कंत्राटी पद्धतीने भरती करण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

जिल्हा व तालुका अभियान कक्षात ४०१ जागा
जिल्हा अभियान व्यवस्थापक पदाच्या १५ जागा, जिल्हा व्यवस्थापक पदाच्या १६ जागा, जिल्हा व्यवस्थापक (विपणन व ज्ञान) पदाच्या १६ जागा, कार्यालयीन अधीक्षक पदाच्या १९ जागा, तालुका अभियान व्यवस्थापक पदाच्या १६६ जागा आणि तालुका व्यवस्थापक पदाच्या १६९ जागा

क्लस्टर कोओर्डीनेटर पदाच्या ५८० जागा
पुणे जिल्हा ६६ जागा, सांगली जिल्हा ५३ जागा, कोल्हापूर जिल्हा ५७ जागा, सातारा जिल्हा ५५ जागा, औरंगाबाद जिल्हा ५९ जागा, रायगड जिल्हा ५२ जागा, नागपूर जिल्हा ५४ जागा, अहमदनगर जिल्हा ६६ जागा, सिंधुदुर्ग जिल्हा १४ जागा, नाशिक जिल्हा ६९ जागा आणि नंदुरबार जिल्हा ३५ जागा

अर्ज सुरु होण्याची तारीख – ७ मार्च २०१९ आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – २७ मार्च २०१९ आहे.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

संक्षिप्त जाहिरात पहा

ऑनलाईन अर्ज करा 

 

 

 

 

Comments are closed.

Visitor Hit Counter