ठाणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागात विविध पदांच्या १७९ जागा

राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान (NUHM) ठाणे महानगरपालिका, ठाणे यांच्या सार्वजनिक आरोग्य विभागातील विविध पदांच्या एकूण १७९ जागा कंत्राटी पद्धतीने भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत.

पुर्ण वेळ वैद्यकीय अधिकारी पदाच्या ११ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार एमबीबीएस पदवीधारक असावा.

स्टाफ नर्स (GNM) पदाच्या ८४ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार जनरल नर्सिंग मिडवाईफरी (GNM) उत्तीर्ण असावी.

प्रसाविका (ए.एन.एम.) पदाच्या ४७ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार दहावी उत्तीर्णसह ए.एन.एम. कोर्स उत्तीर्ण असावी.

प्रयोगशाळा तंत्रज्ञ पदाच्या २४ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार बी.एस्सी. उत्तीर्णसह डी.एम.एल.टी. कोर्स पूर्ण केलेला असावा.

औषध निर्माता पदाच्या १२ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवाराने डी.फार्म. कोर्स पूर्ण केलेला असावा.

प्रोग्राम असिस्टंट पदाची १ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार कोणत्याही शाखेतील पदवीधारक आणि MS-CIT सह मराठी व इंग्रजी टायपिंग ३० श.प्र.मि. वाणिज्य परीक्षा उत्तीर्ण असावा.

वयोमर्यादा – उमेदवाराचे वय १८ ते ३८ वर्ष दरम्यान असावे. (मागासवर्गीय उमेदवारांसाठी ५ वर्षे सवलत.)

नोकरीचे ठिकाण – ठाणे शहर

परीक्षा फीस – नाही.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – सार्वजनिक आरोग्य विभाग, ४ था मजला, ठाणे महानगरपालिका भवन, सरसेनानी जनरल अरुणकुमार वैद्यमार्ग, पांचपाखाडी, ठाणे, पिनकोड: ४००६०२

अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख – २५ मार्च २०१९ (सायंकाळी ५:३० वाजेपर्यंत.)

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात डाऊनलोड करा

अर्जाचा नमुना डाऊनलोड करा

 

 

Comments are closed.

Visitor Hit Counter