अहमदनगर जिल्ह्यातील आदिवासी विकास प्रकल्पात शिक्षक पदांच्या ६३ जागा

आदिवासी विकास विभागाच्या अहमदनगर जिल्ह्यातील आदिवासी विकास प्रकल्प, राजूर, ता.अकोले, जि. अहमदनगर यांच्या आस्थापनेवरील विविध संवर्गातील शिक्षक पदांच्या एकूण ६३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेद्वारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध शिक्षक पदांच्या एकूण ६३ जागा
क्रीडा शिक्षक/ क्रीडा मार्गदर्शक पदांच्या २१ जागा, कला (कार्यानुभव) शिक्षक पदांच्या २१ जागा आणि संगणक शिक्षक/ निर्देशक पदाच्या २१ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार अनुक्रमे बी.पी.एड. किंवा ए.टी.डी.(कला शिक्षक डिप्लोमा) किंवा बी.एस्सी (सीएस/ आयटी) अथवा बी.सी.ए. अथवा बी.ई., बी.टेक. अर्हता धारक असावा.

नोकरीचे ठिकाण – अहमदनगर जिल्हा

फीस – ३००/- रुपये आहे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, राजूर, ता. अकोले, जि. अहमदनगर, पिनकोड: ४२२६०४

अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख – १७ ऑगस्ट २०१९ आहे.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात व अर्जाचा नमुना   अधिकृत संकेतस्थळ

 


Comments are closed.