महाराष्ट्रात बांधकाम, कृषी, मत्स्यसह विविध विभागात लवकरच मेगाभरती

विधानसभा निवडणुकीपूर्वी राजकीय क्षेत्रात झालेली मेगाभरती आता रोजगार क्षेत्रातही होणार आहे. विविध सरकारी विभागांमध्ये दहावी उत्तीर्ण ते उच्चशिक्षितांसाठी नोकरीच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. यामध्ये सार्वजनिक बांधकाम विभाग, म्हाडा, पोस्ट, कृषी, मत्स्य विभाग, बँकिंग क्षेत्रांचा समावेश आहे. त्याजोडीला रिझर्व्ह बँक, प्राप्तिकर विभाग, कस्टम्स, सीबीआय आदी विभागांमध्येही क्लर्क पदे खुली होण्याची शक्यता आहे.

कृषी क्षेत्राचे महत्त्व ओळखून ठाणे, पुणे, औरंगाबाद, कोल्हापूर, नागपूर, नाशिक, पुणे, लातूर विभागात कृषीसेवक पदांची संधी आहे. नागपूर (२४९ पदे), अमरावती (२३९), लातूर (१६९), औरंगाबाद (११२) येथे ही पदे असतील. महाराष्ट्र डाक विभागात पोस्टमनला सहाय्यक असलेल्या ३,६५० ग्रामीण डाकसेवक पदांसाठी अर्ज करण्यासाठी ३० नोव्हेंबरपर्यंत मुदत आहे. (संपूर्ण बातमी वाचा)

 


Comments are closed.

Visitor Hit Counter