इंडियन ऑइल कार्पोरेशन लिमिटेड मध्ये प्रशिक्षणार्थी पदांच्या ३९० जागा

भारत सरकारचा उपक्रम असलेल्या इंडियन ऑइल कार्पोरेशन लिमिटेड यांच्या आस्थापनेवरील प्रशिक्षणार्थी पदांच्या ३९० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने राज मागविण्यात येत आहेत.

ट्रेड अप्रेन्टिस & टेक्निशिअन अप्रेन्टिस पदाच्या ३९० जागा
पश्चिम क्षेत्र पाईपलाईन मध्ये १२० जागा, उत्तरी क्षेत्र पाईपलाईन मध्ये १०० जागा, पूर्वी क्षेत्र पाईपलाईन मध्ये १०० जागा, दक्षिणी क्षेत्र पाईपलाईन मध्ये २५ जागा आणि साउथ ईस्टर्न रीजन पाईपलाईन (एसईआरपीएल) मध्ये ४५ जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवार ट्रेड अप्रेन्टिस करिता पदवीधर आणि टेक्निशिअन अप्रेन्टिस करिता मेकॅनिकल/ ऑटोमोबाइल/ इलेक्ट्रिकल/ टेलीकम्युनिकेशन अँड इंस्ट्रुमेंटेशन/ इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकी पदविका उत्तीर्ण असावा.
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय १९ सप्टेंबर २०१८ रोजी १८ ते २४ वर्षे दरम्यान असावे.(मागासवर्गीय उमेदवारांसाठी ३ वर्ष आणि अनुसूचित जाती/ जमाती प्रवर्गातील उमेदवारांसाठी ५ वर्ष सवलत.

परीक्षा – नोव्हेंबर किंवा डिसेंबर २०१८ मध्ये लेखी परीक्षा घेण्यात येईल.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – १२ ऑक्टोबर २०१८ आहे.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात डाऊनलोड करा

ऑनलाईन अर्ज करा

 

 

 

Comments are closed.