कर्मचारी राज्य विमा महामंडळाच्या आस्थापनेवरील विशेषज्ञ पदाच्या एकूण ३२९ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत.

विशेषज्ञ (सिनिअर स्केल) पदाच्या ७२ जागा
शैक्षणिक पात्रता – भारतीय वैद्यकीय परिषद कायदा १९५६ नुसार पदवीधारकांना तिसऱ्या अनुसूची (लायसेंटीएट पात्रता सोडून इतर) मधील पहिल्या किंवा द्वितीय अनुसूची किंवा भाग-२ मध्ये वैद्यकीय पात्रता किंवा पदव्युत्तर पदवी अर्हतासह ५ वर्ष अनुभव असणे आवश्यक आहे.

विशेषज्ञ (ज्युनिअर स्केल) पदाच्या २५७ जागा
शैक्षणिक पात्रता – भारतीय वैद्यकीय परिषद कायदा १९५६ नुसार पदवीधारकांना तिसऱ्या अनुसूची (लायसेंटीएट पात्रता सोडून इतर) मधील पहिल्या किंवा द्वितीय अनुसूची किंवा भाग-२ मध्ये वैद्यकीय पात्रता किंवा पदव्युत्तर पदवी अर्हतासह ५ किंवा ३ वर्ष अनुभव असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा – उमेदवाराचे वय २४ जानेवारी २०१९ रोजी १८ ते ४५ वर्ष दरम्यान असणे आवश्यक आहे. (अनुसूचित जाती/ जमाती प्रवर्गातील उमेदवारांसाठी ५ वर्ष आणि इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी ३ वर्ष सवलत.)

नोकरीचे ठिकाण – भारतात कुठेही

परीक्षा फीस – खुल्या/ इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी ५००/- रुपये आणि अनुसूचित जाती/ जमाती अपंग/ कार्यालयीन कर्मचारी/ महिला/ माजी सैनिक उमेदवारांसाठी फीस मध्ये पूर्णपणे सवलत.)

अर्ज पाठविण्याचा पत्ता (महाराष्ट्र) – Additional Commissioner/Regional Director, ESI Corporation, Panchdeep Bhawan, 108, N.M. Joshi Marg, Lower Parel, Mumbai, Pincode: 400013

अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख – २४ जानेवारी २०१९ आहे.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात डाऊनलोड करा

अर्जाचा नमुना डाऊनलोड करा

 

 

Comments are closed.

     
Visitor Hit Counter