आर्मी कल्याण एज्युकेशन सोसायटी मार्फ़त केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अंतर्गत संपूर्ण देशात चालविण्यात येणाऱ्या विविध आर्मी पब्लिक स्कूल यांच्या आस्थापनेवरील शिक्षक पदाच्या जवळपास ८००० जागा भरण्यासाठी नोव्हेंबर २०१८ मध्ये सामाईक निवड चाचणी परीक्षा- २०१८ आयोजित करण्यात आली असून सदरील परीक्षेत सहभागी होण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

पदव्युत्तर शिक्षक (PGT) पदाच्या जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार ५०% गुणांसह पदव्युत्तर पदवीसह बी.एड उत्तीर्ण असावा.

प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (PGT) पदाच्या जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार ५०% गुणांसह पदवीसह बी.एड उत्तीर्ण असावा.

प्राथमिक शिक्षक (PRT) पदाच्या जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार ५०% गुणांसह पदवीसह बी.एड/ डी.एड/ समतुल्य कोर्स उत्तीर्ण असावा. (सीटीईटी/ टीईटी परीक्षा बंधनकारक नाही.)

वयोमर्यादा – विना अनुभवी उमेदवारांचे वय १ एप्रिल २०१९ रोजी ४० वर्ष पेक्षा जास्त नसावे तसेच अनुभवी उमेदवारांसाठी १० वर्ष सवलत. (दिल्ली शाळांच्या बाबतीत टीजीटी/ पीआरटी पदांसाठी २९ वर्षे आणि पीजीटी पदांसाठी ३६ वर्षे पेक्षा जास्त नसावे.)

नोकरीचे ठिकाण – भारतात कुठेही

परीक्षा फीस – ५००/- रुपये

प्रवेशपत्र – ३ नोव्हेंबर २०१८ पासून उपलब्ध होतील.

सामाईक परीक्षा – १७ व १८ नोव्हेंबर २०१८ रोजी घेण्यात येईल.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – २४ ऑक्टोबर २०१८ ( सायंकाळी ५ वाजेपर्यंत)

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात डाऊनलोड करा

ऑनलाईन अर्ज करा

Comments are closed.

     
Visitor Hit Counter