महाराष्ट्रातील जिल्हा व सत्र न्यायालयात आहेत न्यायाधीशांची १८३ पदे रिक्‍त

महाराष्ट्रातील देशभरातील जिल्हा व सत्र न्यायालयात न्यायाधीशांचे 5436 पदे रिक्त असल्याची खळबळजनक माहिती प्राप्त झाली आहे. न्यायाधीशांची सर्वाधिक रिक्त पदे भाजपशासित राज्यांमध्ये असून महाराष्ट्रात 183 पदे रिक्त आहेत. यामुळे न्याय मिळण्यास विलंब होत आहे.

विधी व न्याय मंत्रालयातील उच्चस्तरीय सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, देशभरातील जिल्हा व सत्र न्यायालयात जवळपास साडेपाच हजार न्यायाधीशांची पदे रिक्त आहेत. संपूर्ण देशात न्यायाधीशांचे 22545 पदे मंजूर आहेत. यापैकी 17109 न्यायाधीश कार्यरत आहेत तर 5436 न्यायाधीशांच्या जागा रिक्त आहेत. (संपूर्ण बातमी वाचा)

Comments are closed.

Visitor Hit Counter