राज्यातील सर्व ‘अराजपत्रित’ पदांची भरती करण्यास लोकसेवा आयोग तयार

शासनातील अराजपत्रित पदांच्या भरतीची प्रक्रिया राबवण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून (एमपीएससी) सकारात्मक प्रतिसाद देण्यात आला आहे. आता राज्य शासनाने निर्णय घेऊन भरती प्रक्रिया राबवण्यास परवानगी देणे आवश्यक आहे. राज्यभरातील उमेदवारांची मागणी लक्षात घेऊन काही दिवसांपूर्वी राज्य शासनाकडून सर्व शासकीय कार्यालयातील अराजपत्रित पदांच्या भरती प्रक्रिया राबवण्याबाबत महाराष्ट्र लोकसेवा आयोग (एमपीएससी) यांच्याकडे देण्यात प्रस्ताव आलेल्या प्रस्तावाला आयोगाने (एमपीएससी) सकारात्मक प्रतिसाद दिला आला असून, राज्यातील अराजपत्रित पदांची भरती प्रक्रिया राबवण्यास तयार असल्याचे पत्राद्वारे १४ जुलै २०२० रोजीच शासनाला कळवण्यात आयोगाने म्हटले आहे.

आता राज्य शासनाने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे अराजपत्रित पदांची भरती प्रक्रिया सोपवल्यास राज्यभरातील लाखो उमेदवारांना दिलासा मिळणार असून एकूणच भरती प्रक्रिया अधिक सुलभ आणि पारदर्शक होण्याची शक्यता वाढली आहे. आयोगाकडून २०१५ मध्येही अराजपत्रित पदांची आणि सार्वजनिक बांधकाम विभाग, जलसंपदा विभागातील कनिष्ठ अभियंता पदांची भरती प्रक्रिया राबवण्याबाबत तयारी असल्याचे शासनाला कळवण्यात आले होते. तथापि त्यानंतरच्या पाच वर्षांत शासन स्तरावर कोणताही निर्णय न घेता इतर खासगी संस्थांच्या माध्यमातून भरती प्रक्रिया राबवण्यात आली होती. मात्र आता सरकार बदलल्यानंतर तरी भरती प्रक्रियेची जबाबदारी आयोगाकडे (एमपीएससी) सोपविण्यात येईल, अशी राज्यातील बेरोजगारांना अशा आहे.

सर्व संवर्गाच्या पदभरतीबाबत शासनाकडून प्राप्त झालेल्या प्रस्तावास आयोगाने सकारात्मक प्रतिसाद दिला असून आता पुढील कार्यवाही शासन स्तरावर होणे अपेक्षित आहे. या संदर्भातील भरती प्रक्रिया राबवण्याची आयोगाची तयारी असल्याचे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे सहसचिव सुनील अवताडे (परीक्षा पूर्व आणि माहिती तंत्रज्ञान विभाग) यांनी सांगितले आहे.

 

संपूर्ण बातमी वाचा

महत्वाच्या जाहिराती

इतर जाहिराती पाहा

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!


3 Comments
  1. Sandeep says

    Thanks

  2. Anees pathan says

    थँक्स

  3. Farhan says

    Thanks

Comments are closed.