महापोर्टल बंद करून शासकीय भरतीसाठी नव्या संस्थेची निवड करणार !!

उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारने आता महापोर्टल मार्फत होणारी शासकीय भरती बंद करणार असून शासन भरतीचे काम नव्या संस्थेला देण्यासाठी कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.

राज्य शासनातील गट ‘क’ आणि ‘ड’च्या पदभरतीसाठी नव्या संस्थेची निवड केली जाणार आहे. महाआयटी मार्फत या नव्या संस्थेची निवड केली जाणार आहे. याबाबत राज्य सरकारने निर्णय जारी केला आहे. महापोर्टलबाबत आलेल्या तक्रारीनंतर महाविकास आघाडी सरकारने हा निर्णय घेतल्याचं सांगण्यात येत आहे.

Comments are closed.