मद्रास फर्टिलायझर्स लिमिटेड मध्ये विविध पदांच्या एकूण ९३ जागा (मुदतवाढ)

मद्रास फर्टिलायझर्स लिमिटेड यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या 93 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख २५ ऑक्टोबर २०१९ आहे.

विविध पदांच्या एकूण ९३ जागा
पदवीधर अभियांत्रिकी प्रशिक्षणार्थी/ व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी, तांत्रिक सहाय्यक प्रशिक्षणार्थी/ विश्लेषक प्रशिक्षणार्थी, लेखाकार, कनिष्ठ सहाय्यक व्यावसायिक/ साहित्य व्यवस्थापन, कनिष्ठ विपणन सहाय्यक आणि कनिष्ठ कर्मचारी सहाय्यक पदांच्या जागा

वेतनश्रेणीपदवीधर अभियांत्रिकी प्रशिक्षणार्थी / व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी पदाकरिता ३०,०००/- रुपये, तांत्रिक सहाय्यक प्रशिक्षणार्थी/ विश्लेषक प्रशिक्षणार्थी पदाकरिता २०,०००/- रुपये तसेच  लेखाकार, कनिष्ठ सहाय्यक व्यावसायिक आणि साहित्य व्यवस्थापन, कनिष्ठ विपणन सहाय्यक, कनिष्ठ कर्मचारी सहाय्यक पदाकरिता  १८,०००/- रुपये प्रतिमहिना मानधन दिले जाईल.

वयोमर्यादा – खुल्या प्रवर्गातील उमेदवाराचे कमाल वय २५ वर्ष तसेच इतर मागास प्रवर्गातील उमेदवारांकरिता २८ वर्ष आणि अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवारांकरिता ३० वर्ष पेक्षा जास्त नसावे. तसेच पदवीधर अभियांत्रिकी प्रशिक्षणार्थी/ व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी पदाकरिता खुल्या प्रवर्गातील उमेदवाराचे वय २८ असावे तसेच  इतर मागास प्रवर्गातील उमेदवारांकरिता ३१ वर्ष आणि अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवारांकरिता ३३ वर्ष पेक्षा जास्त नसावे.

परीक्षा फीस – खुल्या प्रवर्गातील उमेदवारांकरिता ५००/- रुपये तसेच इतर मागास प्रवर्गातील उमेदवारांकरिता ३००/- रुपये आहे.

नोंदणी करण्याची शेवटची तारीख – दिनांक २५ ऑक्टोबर २०१९ पर्यंत सायंकाळी ५ वाजेपर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

 

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा       ऑनलाईन अर्ज करा

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!


Comments are closed.