भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या आस्थापनेवर सहाय्यक पदांच्या ७८७१ जागा

भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या आस्थापनेवरील सहाय्यक पदांच्या एकूण ७८७१ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

सहाय्यक पदांच्या एकूण ७८७१ जागा
मध्य विभागीय (CZ) कार्यालयात ४७२ जागा, पूर्व विभागीय (EZ)कार्यालयात ९८० जागा, पूर्व मध्य विभागीय (ECZ) कार्यालयात १४९७ जागा, उत्तर विभागीय (NZ) कार्यालयात १५४४ जागा, उत्तर मध्य विभागीय (NCZ) कार्यालयात १२४२ जागा, दक्षिणी विभागीय (SZ) कार्यालयात ४०० जागा, दक्षिण मध्य विभागीय (SCZ) कार्यालयात ६३२ जागा, पश्चिम विभागीय (WZ) कार्यालयात ११०४ जागा अशा एकूण ७८७१ जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवार कोणत्याही शाखेतील पदवीधारक असावा. (माजी सैनिक प्रवर्गातील उमेदवारांसाठी बारावी उत्तीर्णसह १० वर्ष सेवा किंवा दहावीसह उत्तीर्णसह १५ वर्ष सेवा आवश्यक आहे.)

वयोमर्यादा – उमेदवाराचे वय १ सप्टेंबर २०१९ रोजी १८ ते ३० वर्ष दरम्याबी असावे. (अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवारांना ५ वर्ष आणि इतर मागासवर्गीय उमेदवारांना ३ वर्ष सवलत.)

नोकरीचे ठिकाण – भारतात कुठेही

परीक्षा फीस – खुल्या/ इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी ५१०/- रुपये तर अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती/ अपंग प्रवर्गातील उमेदवारांना ८५/-रुपये आहे.)

प्रवेशपत्र – दिनांक १५ ते २२ ऑक्टोबर २०१९ दरम्यान उपलब्ध होईल.

पूर्व परीक्षा – दिनांक २१ व २२ ऑक्टोबर २०१९ रोजी ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येईल.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – १ ऑक्टोबर २०१९ आहे.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिराती पाहा  ऑनलाईन अर्ज करा

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!


Comments are closed.