टीम इंडिया ‘या’ दिवशी खेळणार पहिली दिवस-रात्र कसोटी : सौरव गांगुली

भारत आणि बांगलादेश यांच्यात रंगणारा दुसरा कसोटी सामना कोलकाता येथील ईडन गार्डन्स स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहे. हा कसोटी सामना भारत आणि बांगलादेश या दोनही संघांचा पहिला दिवस-रात्र कसोटी सामना असणार आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने बांगलादेश क्रिकेट मंडळासमोर (बीसीबी) याबाबतचा प्रस्ताव ठेवला होता. बांगलादेश क्रिकेट मंडळाने याबाबत होकार दर्शवला असून भारतात पहिल्यांदाच दिवस-रात्र कसोटी सामन्याचा आनंद चाहत्यांना लुटता येणार आहे.

बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली याने या वृत्ताला दुजोरा दिला आहे. २२ ते २६ नोव्हेंबर दरम्यान हा दिवस-रात्र कसोटी सामना खेळण्यात येणार आहे. “दिवस-रात्र कसोटी ही खूपच चांगली संकल्पना आहे. कसोटी क्रिकेटला पाठिंबा देणे आणि प्रेरणा मिळणे आवश्यक आहे. मी आणि माझे सहकारी यासाठी कटिबद्ध आहोत. याशिवाय दिवस-रात्र कसोटी खेळण्याची तयारी दर्शवल्याबद्दल विराट आणि सर्व क्रिकेटपटूंचेही आभार”, असे गांगुलीने सांगितले. (संपूर्ण बातमी वाचा)


Comments are closed.

Visitor Hit Counter