राज्यातील पहिली ते आठवीच्या वर्गाच्या शिक्षकांना आता सरकारचे ओळखपत्र 

राज्यातील सरकारी, निमसरकारी, स्थानिक स्वराज्य संस्था आणि अनुदानित शाळांमधील शिक्षकांना ओळखपत्र देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी चालू शैक्षणिक (2019-20) वर्षी केली जाणार आहे. यासाठी एक कोटी 93 लाख 583 रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.

यानुसार राज्यातील इयत्ता पहिली ते आठवीच्या वर्गाच्या तीन लाख 87 हजार 164 शिक्षकांना यंदा ओळखपत्रे दिली जाणार आहेत. शिक्षकांच्या ओळखपत्रावर महाराष्ट्र शासनाच्या उल्लेखास आणि त्याबाबतचा लोगो वापरण्यास मात्र बंदी घालण्यात आलेली आहे. (संपूर्ण बातमी वाचा)

 


Comments are closed.

Visitor Hit Counter