टपाल विभागाच्या वेबसाईटमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने उमेदवाराची तारांबळ

दहावी उत्तीर्ण असलेल्या बेरोजगार तरुणांनासाठी गेल्या काही दिवसापासून भरतीत डाक महाराष्ट्र सर्कल मध्ये 3 हजार 540 जागांसाठी भरती निघाली आहे. यामध्ये ब्रॅंच पोस्ट मास्टर, असिस्टंट पोस्ट मास्टर, डाक सेवक अशा तीन पदासाठी जागा आहेत. पण, वेबसाईटमध्ये तांत्रिक बिघाड असल्याने विद्यार्थ्यांना अर्ज भरण्यास अडचणी येत आहेत. साहजिकच अर्ज भरू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये रोष निर्माण झाला आहे.

एवढी मोठी भरती निघाल्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसह शहरी भागातील विद्यार्थी देखील अर्ज भरू इच्छित आहेत. शहरातील अनेक सायबर कॅफेमध्ये सध्या मोठ्या प्रमाणात गर्दी दिसत असून यात डाक विभागाचे अर्ज भरण्याऱ्या विद्यार्थ्यांची संख्या अधिक असल्याने 30 नोव्हेंबर २०१९ पर्यंत अर्ज भरून पूर्ण होतील कि नाही याबद्दल सांशकता आहे. (संपूर्ण बातमी वाचा)

 


Comments are closed.

Visitor Hit Counter