भयंकर! वाढत्या प्रदूषणामुळं भारतीयांचं आयुष्य ७ वर्षांनी घटल्याचा निष्कर्ष

वाढत्या प्रदूषणाचा विळखा गंगा नदीच्या आसपासच्या प्रदेशाला वेगाने बसत आहे. यामुळे गंगेच्या पठारावर राहणाऱ्या भारतीयांचे आयुर्मान सात वर्षांनी घटले असल्याचा धक्कादायक निष्कर्ष अमेरिकेतील शिकागो विद्यापीठातील एनर्जी पॉलिसी इन्स्टिट्यूटने काढला आहे. १९९८ ते २०१६ या १८ वर्षांतील प्रदूषणाचा अभ्यास करून या संस्थेने आपला अहवाल प्रसिद्ध केला आहे.

गंगा स्वच्छता मोहिमेला सरकार प्राधान्य देत असतानाच या नदीप्रदेशातच प्रदूषणाची पातळी वाढलेली असणे ही बाब चिंताजनक आहे. उत्तर भारतातील गंगेच्या पठारावरील प्रदूषण हे उर्वरित देशातील प्रदूषणापेक्षा तिप्पट धोकादायक असल्याचेही या अहवालात नमूद करण्यात आले आहे. (संपूर्ण बातमी वाचा)

 


Comments are closed.

Visitor Hit Counter