औरंगाबाद येथील औद्योगिक वसाहतीत पन्नास कंपन्यांचे कामकाज सुरू

देशात कोरोना व्हायरसचे संक्रमण होऊ नये म्हणून पुकारण्यात आलेल्या टाळेबंदी मधून सरकारने काही अंशी सवलती दिल्यानंतर औरंगाबाद येथील बऱ्याच कंपन्यांनी स्वतःच्या जबाबदारीवर आपले कामकाज सुरु केले असून या कंपन्यांना महापालिका हद्दीबाहेरील कर्मचाऱ्यांना कामावर ने-आण करण्यास वाहनांना परवानगी देण्यात आली आहे. लॉकडाऊनचे सर्व नियम पाळून औरंगाबाद येथील औद्योगिक वसाहतीत जवळपास पन्नास कंपन्यांनी आपले कामकाज सुरू केल्याचे समजते.

Comments are closed.