मुंबई उच्च न्यायालयाच्या आस्थापनेवर सिस्टीम ऑफिसर पदांच्या १६५ जागा

मुंबई उच्च न्यायालयाच्या अधिनस्त असलेल्या राज्यातील जिल्हा आणि तालुका न्यायालयाच्या आस्थापनेवरील सिनिअर सिस्टीम ऑफिसर आणि सिस्टीम ऑफिसर पदांच्या एकूण १६५ जागा कंत्राटी पद्धतीने भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेद्वारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

सिस्टीम ऑफिसर पदांच्या एकूण १६५ जागा
सिनिअर सिस्टीम ऑफिसर पदांच्या ३८ जागा आणि सिस्टीम ऑफिसर पदाच्या १२७ जागा

शैक्षणिक पात्रता – सिनिअर सिस्टीम ऑफिसर पदांसाठी बी.ई./ बी.टेक.(कॉम्पुटर सायन्स/ इलेक्ट्रॉनिक/ आयटी)/ एमसीए किंवा नेटवर्क प्रमाणपत्र/ एमसीएसई/ आरएचसीई/ आरएचईएल आणि ५ वर्ष अनुभव तसेच सिस्टीम ऑफिसर पदांसाठी बी.ई./ बी.टेक. (कॉम्पुटर सायन्स/ इलेक्ट्रॉनिक/ आयटी)/ एमसीए किंवा नेटवर्क प्रमाणपत्र/ एमसीएसई/ आरएचसीई/ आरएचईएल आणि किमान १ वर्ष अनुभव आवश्यक आहे.

वयोमर्यादा – उमेदवाराचे वय १८ ते ३८ वर्षे दरम्यान असावे. (मागासवर्गीय उमेदवारांना ५ वर्ष सवलत.)

नोकरीचे ठिकाण – महाराष्ट्रात कुठेही

परीक्षा फीस – नाही

अर्ज सुरु होण्याची तारीख – दिनांक ५ ऑक्टोबर २०१९ आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २१ ऑक्टोबर २०१९ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

 

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा  ऑनलाईन अर्ज करा

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!


Comments are closed.