मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात लिपिक/ शिपाई पदाच्या २०४ जागा

मुंबई उच्च न्यायालयाचे नागपूर खंडपीठ यांच्या आस्थापनेवरील लिपिक (क्लार्क) पदाच्या निवड यादी/ प्रतीक्षा यादी प्रत्येकी ६४ जागा आणि शिपाई पदाच्या निवड यादी/ प्रतीक्षा यादी प्रत्येकी ३८ जागा अशा एकूण २०४ जागा भरण्यासाठी उमेदवारांची निवड करण्याकरिता पदांनुसार पात्रताधारक उमेद्वारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

लिपिक (क्लार्क) पदाच्या १२८ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार पदवीधर आणि इंग्रजी टायपिंग ४० श.प्र.मि सह MS-CIT किंवा समतुल्य अर्हता धारक असावा.

शिपाई पदाच्या एकूण ७६ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार इय्यता सातवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा – उमेदवाराचे वय १ ऑगस्ट २०१९ रोजी १८  ते ३८ वर्षे दरम्यान असावे. (मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांना ५ वर्ष सवलत.)

नोकरीचे ठिकाण – नागपूर

परीक्षा फीस – लिपिक पदांसाठी १००/- रुपये आणि शिपाई पदांसाठी ५०/- रुपये आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – १७ ऑगस्ट २०१९ आहे.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

लिपिक जाहिरात  शिपाई जाहिरात  ऑनलाईन अर्ज करा

 


Comments are closed.