सैन्य भरतीच्या आमिषाने तरुणांची फसवणूक करणाऱ्या टोळीचा सुळसुळाट

सध्या राज्यात विभागवार सैन्य भरती प्रक्रिया सुरु असून ग्रामीण व शहरी भागातील सामान्य कुटुंबातील तरुण-तरुणी भरतीपूर्व तयारीसाठी मेहनत घेताना दिसत आहेत. अनेक तरुणांनी ऍकॅडमीमध्ये प्रवेश घेतला असून त्यांची कसून तयारी सुरु आहे. परंतु काही एजंट तरुणांना भरतीचे आमिष दाखवून लाखो रुपयांची मागणी करुन फसवणूक करत असल्याचे प्रकार वाई तालुक्‍यात वाढीस लागले आहेत. अशा प्रकारची फसवणूक करणारांची टोळीच तालुक्‍यात सक्रिय झाल्याचे बोलले जात असून पोलिसांनी त्यावर ठोस कारवाई करावी, अशी मागणी होऊ लागली आहे.

सध्याच्या परिस्थितीत उच्च शिक्षण घेऊनही नोकऱ्या मिळत नसल्याने अनेक तरुण बेरोजगार आहे. दिवसेंदिवस हे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे ग्रामीण भागासह शहरातील तरुण वर्ग आता पोलीस आणि सैन्य भरतीकडे मोठ्या प्रमाणात वळल्याचे पहावयास मिळते.

(संपूर्ण बातमी वाचा)

 


Comments are closed.

Visitor Hit Counter