मुंबई येथील परिचर्या/ प्रसूतिशास्त्र ‘अभ्यासक्रम’ करीता ३५० जागा
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय महाविद्यालय व डॉ. रुस्तम नरसी कूपर म्युनिसिपल जनरल हॉस्पिटल, जुहू, मुंबई यांच्यामार्फ़त बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या परिक्षेत्रातील परिचर्या प्रशिक्षण संस्था मध्ये सुरु होणाऱ्या सामान्य परिचर्या व प्रसूतिशास्त्र अभ्यासक्रम (३ वर्ष) करिता प्रशिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या फक्त महिला उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
विद्यार्थी परिचारिका प्रवेशासाठी ३५० जागा
सदरील पदांच्या संख्येत बदल होण्याची शक्यता आहे.
प्रशिक्षण संस्था- (१) डॉ.रू.न. कूपर नेटवर्क, विलेपार्ले, मुंबई, (२) श्री हरीलाल भगवती-२, बोरीवली, मुंबई, (३) रा.ए. चार्ट, चित्र परळ, मुंबई, (४) बा.न.नायर धर्मा, ए. एल. नायर रोड, मुंबई, (५)लो.टि.म.स. सायन, मुंबई
शैक्षणिक पात्रता –
१) उमेदवार महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक शालांत परीक्षा मंडळाची उच्च माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (१०+२) अथवा समतुल्य परीक्षा शासनमान्य संस्थेतून प्राधान्याने जीवशास्त्र, रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र (BIOLOGY, CHEMISTERY, PHYSICS) या शास्त्र विषयासह (पी.सी.बी.) कमीत कमी ४० टक्के गुणांनी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. वरीलप्रमाणे आवश्यक पात्रता धारण करणारे उमेदवार पुरेशा संख्येने उपलब्ध झाले नाहीत तर महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाची कला शाखा व नंतर वाणिज्य शाखा या क्रमाने शाखेतील आणि कोणत्याही विषयातील उच्च माध्यमिक परीक्षा (१०+२) कमीत कमी ४० % गुणांनी उत्तीर्ण करणाऱ्या खुला गटातील उमेदवारांचा व कमीत कमी ३५ % गुणांनी उत्तीर्ण होणाऱ्या मागासवर्गीय गटातील उमेदवारांचा प्रवेशासाठी विचार करण्यात येईल.
२) या अभ्यासक्रमासाठी उपलब्ध असलेल्या जागांतून साहाय्यकारी परिचारिका प्रसविका अभ्यासक्रम (AUXILLIARY NURSE MIDWIFERY) सुधारित अभ्यासक्रम उत्तीर्ण असलेल्या महाराष्ट्र परिचर्या परिषद व महाराष्ट्र राज्य शुश्रूषा व पॅरावैद्यक शिक्षण मंडळ (MAHARASHTRA STATE OF NURSING AND PARAMEDICAL EDUCATION RECOGINIZED) महिला उमेदवारांसाठी ५ टक्के जागा राखीव असतील, मात्र असे उमेदवार आवश्यक अर्हता (१०+२) धारण करीत असावेत व या अभ्यासक्रमाबाबतच्या अन्य अटींची पूर्तता करीत असावेत. तथापि विहित केलेल्या प्रपत्रात प्रतिज्ञापत्र सादर करण्यासापेक्ष जे उमेदवार कोठेही नोकरीला नसतील त्यांना विद्यावेतन अनुज्ञेय राहील. या जागांकरिता जर असे उमेदवार उपलब्ध झाले नाहीत तर सदर जागेत उर्वरित जागा मिळविण्यात येतील.
३) अपंगांसाठी ५ टक्के जागा आरक्षित राहतील या जागांवर उमेदवार उपलब्ध न झाल्यास त्या त्या प्रवर्गातील उमेदवारांमधून निवड करण्यात येईल.
४) उमेदवार दहावी (१० वी) व बारावी (१२ वी) इयत्ता परीक्षा महाराष्ट्र राज्य माध्यमिक मंडळ, उच्च माध्यमिक अथवा समतुल्य शिक्षण मंडळातून उत्तीर्ण झालेली असली पाहिजे.
५) उमेदवार माध्यमिक शालांत प्रमाणपत्र किंवा तत्सम उच्च परीक्षा किमान ५० गुणांचा मराठी विषय घेऊन (उच्च स्तर/ निम्न स्तर) उत्तीर्ण झालेली असली पाहिजे.
६) मराठी भाषा सुलभतेने लिहिता, वाचता व बोलता आली पाहिजे.
विद्यावेतन – दरमहा रु. १००-१०-१२० अधिक रु. ६८०/- गणवेश भत्ता अधिक रु. ३००/- धुलाई भत्ता अधिक मोफत वसतिगृह निवासस्थान व मोफत भोजन या व्यवस्था आहेत.
वयोमर्यादा – महिला उमेदवाराचे वय दिनांक ३१ जुलै २०२५ रोजी १७ वर्ष ते ३५ वर्ष दरम्यान असणे आवश्यक असून उमेदवारांचा जन्म दिनांक १ ऑगस्ट १९९० पासून दिनांक ३१ जुलै २००८ पर्यंत असल्यास प्रवेशास पात्र समजले जाईल.
समुपदेशन -समुपदेशनासाठी निवड झालेल्या उमेदवारांना मुलाखतीसाठी स्वखर्चाने मूळ प्रमाणपत्रे ऑनलाईन अर्जाची प्रत, अर्ज शुल्क पावतीसहित हजर राहावे लागेल. समुपदेशन करिता पात्र उमेदवारांची यादी महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर जाहीर केली जाईल व समुपदेशनासाठी हजर राहणेकरिता उमेदवारांना कुठलाही वैयक्तिक पत्रव्यवहार केला जाणार नाही. समुपदेशन हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय महाविद्यालय व डॉ. रुस्तम नरसी कूपर म्युनिसिपल जनरल हॉस्पिटल, जुहू, मुंबई– ५६ येथे घेण्यात येईल.
सेवेच्या अटी – निवड झालेल्या उमेदवारांना महानगरपालिका कर्मचाऱ्यांची वर्तणूक व शिस्तविषयक नियम व विद्यार्थी परिचारिकांसाठी घालून दिलेले नियम व अधिनियम यांचे बंधन राहील. उमेदवारांना एकदा प्रवेश घेतल्यानंतर मध्येच अभ्यासक्रम सोडून जाता येणार नाही. अन्यथा रु. ११८२२/- इतका दंड आकारण्यात येईल.
अर्ज करण्याची तारीख – दिनांक १७ जुलै २०२५ ते दिनांक २७ जुलै २०२५ दरम्यान ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!